बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करतो, पण ते माझा फोन घेत नाहीत”

पुणे | पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) म्युझियम सेंटरला (Museum Center) विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीची विचारपूस करता, असा प्रश्न केला. त्यावर नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे.

‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करतो. त्यांना फोन करतो. पण ते फोन घेत नाहीत. शिवसेनेच्या ओळखीच्या नेत्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत विचारणा करत असतो’, असं नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) भेटतात. त्यावेळेस तुमचे साहेब कसे आहेत? अशी विचारणा करत असतो. आमचे साहेब चांगले आहेत, असं संजय राऊत सांगतात, असं नारायण राणे यांनी सांगितलं.

संजय राऊत संसदेच्या लॉबिगमध्ये चांगलं बोलत असतात, असा जोरदार टोला नारायण राणे यांनी संजय राऊतांना लगावला आहे. तसेच शिवसेना (ShivSena) युपीएत सहभागी झाली तरी काहीही फरक पडणार नाही. भाजपचे (BJP) 303 खासदार आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाशी गद्दारी केली. त्यांनी बेईमानी करून सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काहीही बोलतात, त्यांचे महानगरपालिकेत 10 नगरसेवक आहेत. त्यांची देशात सत्ता येणार का?, असा खोचक सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, आमची बोट एकदम सुरक्षित असून इथून सुटली की, थेट दिल्लीत जाते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही बुडणारी टायटॅनिक आहे. या जहाजाला प्रत्येकजण आपआपल्या बाजूने खेचत असल्याने या बुडणाऱ्या जहाजात कोणी बसणार नाही, असं टीका नारायण राणे यांनी केली आहे. राज्याचे अधिवेशन कमी दिवसांसाठी घेता यावे याकरिता निर्बंध लादले गेले आहेत. दोन वर्षात कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असल्यामुळे आत्ताच निर्बंध लादू नयेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही, खरा वाघ पहायला अधिवेशनात येणार”

“निवडणूक आली की आमच्या विरोधकांच्या अंगात येतं”, अजित पवारांचा टोला

“विषय राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे”, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

‘…तरच राज्यात Lockdownचा निर्णय होईल’; राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ घटनेला जबाबदार कोण?; अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More