बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘बुधवार पेठ!’, या ठिकाणी जाण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. मात्र ही इच्छा तेवढीच धोकादायक देखील असते. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत देखील घडलं आहे. गावावरून आलेल्या एका व्यक्तीने उत्सुकतेने बुधवार पेठेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्याच्याकडील 26 हजार रुपये लंपास करण्यात आले.

बीडवरून 45 वर्षाचा एक गृहस्थ पुण्यातील बुधवार पेठेत गेला होता. एका महिलेने त्याला जबरदस्ती मिठी मारून त्याच्या खिशातील पाकिटातले 26 हजार रुपये लंपास केले. त्यानंतर संबंधित गृहस्थाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

फिर्यादीनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धानोरा येथील राहणारा हा व्यक्ती असून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता तो बुधवार पेठेतील दाणे आळीमधून पायी जात होता. बिल्डिंगसमोर आरोपी फिर्यादीच्या जवळ आला आणि त्याच्याकडील 26 हजार रुपये लंपास केले

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत. रेड लाइट एरिया म्हणून ओळखली जाणारी बुधवार पेठ अनेकांना महागात पडते या पेठेत अनेक तरुण मोठ्या उल्हासाने जातात. त्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध अशा बुधवार पेठेत जाण्याची इच्छा गावावरून आलेल्या अनेकांना देखील असते आणि हीच इच्छा 45 वर्षाच्या व्यक्तीला महागात पडली
थोडक्यात बातम्या-

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय?

देशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार?, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More