बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्यावर टीका झाली तरी चालेल, पण मी… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी राज्याचा अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात या दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहेत.

माझ्यावर टीका झाली तरी चालेल पण मी खोटं बोलणार नाही. लोकांना धीर देताना उगाच काहीही बोलायचं नसतं. तुम्ही सभागृहात जे बोलता ते केलं नाही, तर लोकं तुम्हाला घरी बसवतील. तुमची सभागृहातील भाषा आणि संसदीय वागणं याचं तुम्हाला भान असलं पाहीजे. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आलं पाहीजे, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

कालपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. याचाच दाखला देत आयोजित कार्यशाळेला वर्ग म्हणून संबोधत काल शाळा भरली आणि आज आपला वर्ग सुरू झाला, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सभापती आणि उपसभापती यांना गुरूजींची उपमा देत त्यांनी गुरूजींसारखं वागल पाहीजे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पाला ठिपक्यांची रांगोळी संबोधत मतदार संघ ठिपके आहेत. हे ठिपके जोडून आपल्याला त्यात विकासाचे रंग भरायचे आहेत, ही सकारात्मक जाणीवही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या नातीला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करतोय डेट???

केंद्राने गरिबांच्या खात्यावर 1 लाख कोटी पाठवले- नरेंद्र मोदी

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More