मी ब्राह्मण नावाआधी ‘चौकीदार’ लावू शकत नाही- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | सुब्रमण्यम स्वामी यांनी आपण ब्राह्मण आहे, त्यामुळे नावात ‘चौकीदार’ शब्द लावू शकत नसल्याचं म्हटल आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ हा शब्द जोडला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपाने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू होताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला.

स्वामी म्हणाले की, मी माझ्या नावाच्या आधी चौकीदार शब्द लावलेला नाही. मी ब्राह्मण असून चौकीदाराने काय करायचे आहे, याचा आदेश मी देईन, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी यापुर्वी अनेकवेळा आपल्याच पक्षावर टीका केली आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री अरुण जेटली यांना त्यांनी नेहमीच लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धनंजय मुंडेंच्या समर्थकाच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या

-भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

-भाजपला फटका ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-तलवारीने चेहऱ्यावर सपासप वार करुन धनंजय मुंडेंच्या समर्थकाची हत्या

-चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात