बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही’; मुख्यमंत्र्याच्या पत्रावर राज्यपालांची नाराजी

मुंबई | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Sing Koshyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackey) यांच्यात संघर्ष रंगला आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवर आक्षेप घेणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा राज्यपालांना पत्रातून उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवलं आहे.

राज्यपालांनी अध्यक्ष निवडीवरून पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी कठोर भाषेत उत्तर दिलं होतं. त्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्याच्या पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. “तुमच्या पत्राचा असयंमी टोन आणि धमकावणारा सुर पाहून मी खूप वैयक्तिक खूप दु:खी झालो आहे,” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

“तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद 208 नुसार नियम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्यात अनुच्छेदात म्हटलं आहे की, जो काही विधीमंडळाचा निर्णय घेतला जाईल. तो सांविधांनिक असला पाहिजे. बेकायदेशीर वाटणाऱ्या प्रकियेला देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही,” अशा इशारा राज्यपालांनी पत्रामधून दिला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्ष निवडणूकीवरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे. सुरुवातीला अध्यक्ष निवडीवरून राज्य सरकारने राज्यपालांना प्रश्न विचारणारे पत्र पाठवले होते. त्यावर राज्यपालांनी अभ्यास करून याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं होत. त्यानंतर राज्य सरकारने राज्यपालांवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

Omicronच्या पहिल्या लक्षणाचा प्रसार होण्यापहिलेच व्हा सावधान, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव हिचं निधन

“15 लाखांच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही,” भाजप खासदाराच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More