बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी गौतम गंभीरला माझा आदर्श मानतो”; ‘या’ स्टार खेळाडूनं सांगितलं गुपित

चेन्नई | भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा माझा क्रिकेट आयकॉन आहे आणि मी अजूनही त्याचे फलंदाजीचे व्हिडीओ पाहतो. भारतासाठी खेळलेल्या सर्व क्रिकेटपटूंकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांच्या कथा वेगळ्या आहेत, असं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल म्हणाला आहे.

तो ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलत होता. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी कथा असते एक वेगळी ओळख असते आणि प्रत्येकजण आपल्या कारकीर्दीत काहीतरी साध्य करण्यासाठी खरंच पुढे जात असतो. मी भारताकडून खेळलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूकडून प्रेरणा घेतो कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही, असं देखील देवदत्त म्हणाला.

देवदत्त म्हणाला की त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्याने बरेच काही केले आणि देशासाठी योगदान दिले. पण माझे रोल मॉडेल  गौतम गंभीर आहे. मी त्यांना फलंदाजी करताना पाहतो. मी अजूनही त्यांचे व्हिडीओ पाहतो. मला अजूनही त्याची फलंदाजी आवडते. गंभीर हे माझे क्रिकेटींग रोल मॉडेल आहेत, असं देखील त्याने यावेळी सांगितलं.

दरम्यान, मला असा विश्वास आहे की एक संघ म्हणून आपण आपल्या कौशल्यावर आणि सामर्थ्यावर अवलंबून राहावे. मुंबई इंडियन्स निश्चितच चॅम्पियन संघ आहे. त्यांना ही स्पर्धा कशी जिंकता येईल हे माहिती आहे. त्यामुळे जर आम्ही त्यांच्या कौशल्यांकडे लक्ष दिले तर आम्ही त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही, असं आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा”

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही; प्रशासनाची धक्कादायक कबुली

लस उत्सवावरून राहूल गांधींचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केलं ‘हे’ आवाहन

“कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र कसा सांभाळणार”

…म्हणून रोहित शर्मा इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमार यादवनं सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More