सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो- अमित शहा

सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो- अमित शहा

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील वाद शिगेला पोहोचलेला दिसत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारी झालेल्या ‘रोड शो’मध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली.

सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो, असं अमित शहांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

जसं आम्ही इतर राज्यात लढलो तसंच पश्चिम बंगालमध्येही लढलो. मात्र सर्वात जास्त हिंसाचार  बंगालमध्येच झाला आणि याला कारणीभूत तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत, असं म्हणत अमित शहांनी बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जींनी बदला घेण्याची धमकी दिली होती आणि आता त्यांनी माझ्यावर हल्ला केला, असा गंभीर आरोप अमित शहांनी ममता बॅनर्जींवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदींच्या सभेस्थळी विकले ‘मोदी पकोडे’; पोलिसांनी केली अटक

-लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं, पण नवरीविना; मुलाची हृदयद्रावक कहाणी

-मी मुर्ख आहे पण इतकाही मोठा मुर्ख नाही- मणिशंकर अय्यर

-वयाने तुम्ही मोठ्या असाल, पण अनुभवाने मी मोठा आहे – अमित शहा

-…नाहीतर एका सेकंदात भाजप कार्यालयावर करु शकते कब्जा!

Google+ Linkedin