“…ते दृश्य पाहून रात्रभर झोपू शकलो नाही”, भर सभागृहात मुख्यमंत्र्याना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
चंदीगढ | हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत. जेव्हा मी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हु्डा यांना आंदोलनादरम्यान, एका ट्रॅक्टरवर बसलेले आणि महिला आमदारांना हे वाहन दोरीने ओढताना पाहिले तेव्हा मला खूप दु:ख झाले. टीव्हीवर हे चित्र पाहिल्यानंतर मी संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही, असं मनोहरलाल खट्टर सभागृहात म्हणाले.
मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसच्या आंदोलनात घडलेल्या घटनेचा हवाला दिला. महिला आमदारांसोबतचे असे वर्तन वेठबिगार मजुरांपेक्षा अधिक वाईट आहे. आंदोलनादरम्यान, हुड्डा ट्रॅक्टर चालकाच्या जागेवर बसले होते आणि काँग्रेस आमदार हा ट्रॅक्टर रस्सीने ओढत होते, असं खट्टर यावेळी म्हणाले.
याबाबतचा व्हिडीओ मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सभागृहात रडताना दिसत आहेत. त्यांनी याबाबतच्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिला दिनी भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी महिला आमदारांबाबत संवेदनहीनता दाखवली.
दरम्यान, हुड्डा यांनी याबाबत प्रत्युत्तर देताना घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे महिलांनाच अधिक त्रास सहन करावा लागतो. सरकारने दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे काणाडोळा केला आहे.
महिला दिवस पर भूपेंद्र हुड्डा ने महिला विधायकों के प्रति जो संवेदनहीनता दिखाई, उससे मैं आहत हूं।#HaryanaBudgetSession2021https://t.co/leRo2OK5VP pic.twitter.com/ErM4DuSbJ1
— Manohar Lal (@mlkhattar) March 9, 2021
थोडक्यात बातम्या –
‘…अशावेळी आर. आर. पाटील असते तर’; मनसुख हिरेन प्रकरणावर मनसेची प्रतिक्रिया
महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर
देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!
‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण
दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…
Comments are closed.