बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

पंढरपूर | सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अनेक जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यातच शिवसेनेच्या माजी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. या कारणामुळे शिवसेनेतून गोडसे यांची हकलपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेनेतून हकलपट्टी करण्यात आल्यानंतर आता शैला गोडसे यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. यादरम्यान पक्षाने केलेली कारवाई आपल्याला मान्य असून शिवसेना मी घराघरात पोहोचवली असल्याचं गोडसे यांनी म्हटलं आहे. एवढच नाही तर ही कारवाई त्यांना अपेक्षित होती. मात्र त्यांना झालेला जनतेकडूनच्या आग्रहामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पक्षातील कोणावरही गोडसे नाराज नसून त्या राजीनामा देण्याच्या तयारीत होत्या अस त्यांनी म्हटल आहे. आपली प्रतिक्रीया देत असताना पक्षाने त्यांना भरभरुन प्रेम दिलं आणि जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाने त्यांची मदत देखील केली असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा शिवसेना महिला संघटनाची मोठी जबाबदारी शिवसेनेने शैला गोडसे यांना दिली होती. राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा येथील जागांसाठी आता पोटनिवडणुका होणार आहेत. यात भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे

आमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी

“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”

शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More