बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हातात होतं तेव्हा केलं नाही अन् आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यात करतो”

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारला फटकारलं. आता त्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

ठाकरे सरकारला जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठसुट तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात. हो आमचं राज्य असतं, तर आम्ही चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.

‘पाच वर्षे भाजप सरकारच्या हातात ओबीसी विषय होता. मात्र तुम्ही काहीही केलं नाही. भाजप सरकारने डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र सरकारने डाटा दिला नाही आणि आता तुम्ही म्हणताय, चार महिन्यांत करतो’, अशा शब्दांत भुजबळांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज, उद्या, कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओबीसी आरक्षणाच्या डाटासंदर्भात भेटायला जायला तयार आहोत. मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, तुम्ही नेतृत्व करा, तुमच्या नेतृत्वात आम्ही पंतप्रधान मोदींना भेटायला येतो, पण तुम्ही आंदोलन करत आहात, मी स्वागत करतो असंही भुजबळ म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…यामुळे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही- सदाभाऊ खोत

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीची छापेमारी

‘दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं’; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत मोदींचं शायरीतून सूतोवाच

“गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे, मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More