बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दररोज गोमूत्र पिल्यामुळे मी कोरोनापासून बचावले – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळ | भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह यांनी गोमूत्र हाय अँटीबायोटिक असल्याचं म्हटलं. त्यांच्या या दाव्यानं सध्या सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

गोमूत्र आपण पवित्र मानतो. गोमूत्र सेवन केल्यानं अनेक संसर्गजन्य आजार बरे होतात. याशिवाय अनेक संशोधकांनीही म्हटलं आहे की, गोमूत्र हाय अँटीबायोटिक आहे, असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे.

मी ही दररोज गोमूत्राचं सेवन करते आणि म्हणूनच मी कोरोना महामारीपासून बचावले. याशिवाय गोमूत्र प्यायल्यानं फुफ्फुसाचा संसर्गही बरा होतो, असंही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. याआधीही प्रज्ञा सिहं अशाच एका विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

दरम्यान, कोरोना काळातही त्याचं हे वक्तव्य चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं. कोरोना बरा करण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्याचा उपाय करावा, असं प्रज्ञा सिंहनं सांगितलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांना बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

थोडक्यात बातम्या –  

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

पंजशीर जिंकल्याचा आनंद लहान मुलांच्या जिवावर बेतला; हवेत केला गोळीबार अन्…

RSSला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर

मोदींचं मिशन काश्मीर! एक दोन नव्हे तर तब्बल 70 मंत्री करणार जम्मू काश्मीरचा दौरा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More