बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर फोन करा”

अहमदनगर | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. आज राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे दरम्यान अहमदनगर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला होता. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं.

माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर सांगतानाच जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा, फोन नाही उचलला तर मेसेज करा, उत्तर नक्कीच मिळेल, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

सर्वात जास्त जनाधार लाभलेले नेतृत्व शरद पवार साहेबांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, सर्वात अनुभवी नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, 2024 मध्ये श्रीरामपूर आणि राहाता या दोन्ही मतदारसंघात वेगळे चित्र पहायला मिळेल, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यासाठी बुथ कमिट्या तयार करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

बाबो! बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका; ‘या’ शहरात पसरली अफवा अन्…

“चंद्रकांत पाटलांनी 15 डिसेंबरची मुदत दिली होती, म्हणजे 6 महिने…”

प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयात Ph.D.पदवी

मान्सून हंगाम संपला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More