मुंबई | बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “सिनेविश्वात कारकिर्द सुरू केली तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी होती. मी पिपलमेड स्टार असून त्याचप्रमाणे मला ‘पिपलमेड लीडर’ व्हायलाही आवडेल.”
“जरी आज मी शिवसेनेत प्रवेश केला असला तरीही पदाची अपेक्षा नाहीये. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी शिवसेनेत आले. आणि मी एक मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार असंही उर्मिला यांनी सांगितलंय.
आज दुपारी उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हातावर शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं.
महत्वाच्या बातम्या-
विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता
“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”
‘या’ कारणामुळे न्यूझीलंडमधून पाकिस्तानचा संपूर्ण संघ होऊ शकतो हद्दपार!
उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…
पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय