बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणवीसांसारखं वाटलं नाही”

मुंबई | मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावले आहेत.

फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, असंही शरद पवार म्हणाले. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, अशी टीका देखील शरद पवारांनी केली आहे.

अनिल देशमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला होता. त्यांना राजीनामा देण्यासाठी वातावरण तयार करण्यात आलं. मात्र, आरोप करणारे आता कुठं आहेत हे माहिती नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. मावळात जे काही झालं. त्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली. मात्र, मावळच्या शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मावळात कोणची चूक होती हे लक्षात आल्यानंतर मावळवासियांनी राष्ट्रवादीच्या नेत्याला विजयी केलं होतं. असंही शरद पवार म्हणाले. माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण दिलं हे एक बरं झालं. त्यांनी मावळची मानसिकता जाणून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला देखील शरद पवारांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

“लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री”

काय बोलता? तंबाखू खायचं व्यसन 12 हजार वर्षांपूर्वीचं?

मुकेश अंबानींची ‘या’ परदेशी कंपनीत मोठी गुंतवणूक; भारतीय उद्योगक्षेत्राला होणार फायदा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More