उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही!

मुंबई | उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही. पण तो निर्णय अद्याप झालेला नाही, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

कुठल्याही उमेदवाराच्या नावाला विरोध नाही. सगळ्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. ही एक चांगली बाब असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. अन्यथा आम्ही तिकीट लादू शकलो असतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

आता कार्यकर्त्यांची मतं आम्ही जाणून घेतली आहेत. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर उमेदवार निवडले जातील, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यामुळे मुंबई बंद पडणार नाही!

-आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं- नितीन गडकरी

-मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या पोस्टरसमोर भाजप राज्यमंत्र्यानं केली लघवी!

-संजय निरूपमला अक्कल नाही, त्यानं औकातीत रहावं!

-संजय निरूपमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मनसेची आक्रमक पोस्टरबाजी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या