बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर

मुंबई | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 टी- ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 आघाडीवर आहे. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन युवा खेळाडूंना या मलिकेत स्थान दिलं गेलं. संघाकडून खेळण्यासाठी इशान किशनची वर्णी लागली होती. परंतू अद्याप सुर्यकुमार यादवला मैदानात संधी मिळाली नाही. यावरूनच यादवला संधी का दिली गेली नाही?, असा प्रश्न भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने उपस्थित केला आहे.

टी- ट्वेन्टी वर्ल्ड कपला केवळ 7 महिने शिल्लक आहेत. या वर्ल्ड कपमध्ये अचानक चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूची गरज पडली तर तुम्ही सुर्यकुमारला संधी देऊ शकाल का?, असा प्रश्न गंभीरने विचारला आहे. सुर्यकुमार आंतरराष्ट्रीय सामन्यात धावा करू शकतो, हे तुम्हाला माहितच नाही कारण तुम्ही त्याला संधीच दिली नाही. तुम्ही त्याला 3 ते 4 सामन्यात संधी द्यायला पाहिजे होती, असं गंभीर म्हणाला आहे.

के. एल. राहुल सातत्याने अपयशी ठरत असताना तिसऱ्या सामन्यात सुर्यकुमारला का संधी दिली गेली नाही, हे मला आद्याप कळलं नाही, असं गंभीर म्हणाला.

दरम्यान, के. एल. राहुलला मागील तिन्ही सामन्यात एकदाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चौथ्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फाॅर्ममध्ये आहे. तर भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान मिळाल्यानं भारतीय संघ आणखी मजबूत झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे वारकरी संतप्त, पाहा व्हिडीओ

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More