मुंबई | प्रत्येक मुद्द्यावरुन ट्वीट करुन सध्या चर्चेत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा रणावत पुन्हा एकदा तिच्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. मात्र आता तिने तिच्या ट्वीटने बैतूलच्या विधानसभेचे काँग्रेसच पक्षाचे आमदार सुखदेव पानसे यांच्यावर पलटवार केला आहे. कंगणा सध्या धाकड सिनेमाचं शूटींग करत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर पानसेंनी केलेल्या वक्तव्याला कंगणाने ट्वीट द्वारे सणसणीत उत्तर दिलं आहे. ‘हा जो कोणी मूर्ख आहे याला माहीत नाही की, मी कॅटरिना, दिपीका किंवा आलिया नाही’. एवढचं नाही तर कंगणाच्या ट्वीटनुसार तिने एकटीनेच आयटम नंबरसाठी नकार दिला असून अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत काम करण्यासाठी सुद्धा नकार दिला आहे. आणि याच कारणामुळे बाॅलिवूड गँग तिच्या विरोधात आहे. ती एक राजपूत महिला असून ति कंबर हालवत नाही तर थेट हाडं तोडते, असं कंगणाने म्हंटले आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सारणीमध्ये कंगनाच्या ‘धाकड’ या आगामी सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेला विरोध करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेसने रॅली काढली होती. त्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना पानसेंनी कंगणाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होत. तसेच सरकार येत, जात राहतं त्यामुळे पोलिसांनी कंगनाच्या हाताची कठपुतली बनू नये असं देखील पानसे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कंगणाच्या मागच्या एका ट्वीटमध्ये तिने दिल्ली हिंसा करणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं होत. तिच्या या वक्तव्याला दोन दिवस विरोध करत बैतूल जिल्ह्यात काँग्रेसने तिच्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र तरीसुद्धा माफी न मागता कंगणाने तिच ट्वीट चालूच ठेवले.
थोडक्यात बातम्या-
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…
पूजा राठोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती, चुलत भावाला वनखात्यात चिटकवलं?
‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी
कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवी नियमावली लागू, जाणून घ्या नेमकी काय आहे
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस