मुंबई | मला सुरक्षेची गरज नाही मी फिरत राहणार. परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो, असं विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने भाजप नेत्यांसह राज्यातील इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार जाणार आहे. यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था देखील कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
“मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी सुरक्षा घेतली. मी प्रदेशाध्यक्ष होतो तरी साधा एक गार्ड ठेवला नव्हता. या सरकारला कदाचित वाटत असेल की, आता मला गार्डची गरज नाहीये म्हणून, त्यांनी सुरक्षा कमी केली, मला काहीही अडचण नाही, मी विना सुरक्षेचा देखील फिरू शकतो.”
– @Dev_Fadnavis pic.twitter.com/hcplxxqvOJ— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 10, 2021
थोडक्यात बातम्या-
‘…तर भाजपच्या विधानसभेला 175 जागा निवडून आल्या असत्या’; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलियामध्ये सिराज आणि बुमराहच्या अपमानावर किंग कोहली भडकला; म्हणाला…
तुम्ही मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क यांना विकले गेले आहात- कंगणा राणावत
‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा