“अजितदादा तुम्ही जिथं आहात, तिथं मी यायची गरज नाही, आपण एकत्रच…”
मुंबई | गेल्या तीन चार दिवसांपासून महाविकास आघाडीत अंतर्गत वाद आहेत आणि शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी आहे, अशा बातम्या येत होत्या. त्यातच आता मुंबईत आज जीएसटी भवनाच्या भूमीपुजन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगलेली पहायला मिळाली.
अजित पवार यांनी बोलताना मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येत नाहीत. यामुळे नाराजी आणि मतभेदाच्या बातम्या येत आहेत. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादा तुम्ही जिथे आहात तिथे मी येण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. वरिष्ठांमध्ये आलबेल नसल्याच्या बातम्या जाणीवपुर्वक पेरल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. सरकार व्यवस्थित काम करत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येता. मात्र, आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे तुम्हीचं सांगा काय आहे ते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व काही अलबेल असल्याचं म्हणालंय.
थोडक्यात बातम्या-
Sharad Pawar: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका, म्हणाले…
“महागाई कमी होण्यासाठी प्रार्थना करा”; गिरीश बापटांचा भाजपला घरचा आहेर
“6 खासदारांवर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना…”
“गृहखाते काय भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केलं आहे का?”
“मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून…”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.