मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना अमित शहांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचं वचन दिल्याचं खोटं बोलत असल्याचा दावा अमित शहांनी यावेळी बोलताना केला होता. याला शिवसेनेनं आता प्रत्युत्तर दिलं आहे.
शहांनी केलेल्या आरोपांनंतर सध्या शिवसेनेचं एक पत्र व्हायरल झालं आहे. यातून शिवसेनेनं अमित शहांना उत्तर दिलं आहे. तसेच या पत्रातून नारायाण राणे यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. शहांनी शिवसेना संपवण्याचा केलेला उल्लेख ऐकून राणेंना देखील हसू आवरलं नसेल, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
नारायण राणे यांनी 15 वर्ष शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहांना बोलावून शिवसेनेला संपवण्याची सुपारी दिली, अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.
या पत्रातून शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. गुजराती माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपवण्याचं बोलतो आणि कार्यक्रमात असलेले सर्व मराठी जण यावर टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाचं दुर्देवं नसेल, अशी टीका शिवसेनेनं भाजपवर नेत्यांवर केली आहे.
थोडक्यात बातम्या-
अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!
जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; अरुण गवळीच्या कोरोना टेस्टचा निकालही आला!
…तर कोल्हापुरी हिसका दाखवू, ‘या’ भाजप नेत्याला स्वाभिमानीचा इशारा
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी
धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप