बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

उस्मानाबाद | काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला होता. त्यावरून राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यावर पुन्हा एकदा नाना पटोले यांनी आम्ही आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरू राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने पुन्हा स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचा निर्धार केला आहे. परंतू काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवट पर्यंत टिकेलं असं वाटत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी काँग्रेस पक्षावर आणि अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र मंदिर उघडल्यानंतर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडेल. कोरोना असल्याने पक्षप्रवेश रखडले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे पक्ष सोडून गेलेले स्वगृही येण्यास उत्सुक आहेत. परंतू याचा निर्णय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल आणि टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी जयंत पाटलांसोबत मंत्री धनंजय मुंडे, नेते संजय बनसोडे उपस्थितीत होते.

दरम्यान, महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट टळावं, पावसाळ्यात महाराष्ट्रामध्ये पूरसंकट येऊ नये, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुळजाभवानी देवीला साकडं घातलं. तसेच मंदिर खुली करण्याचा निर्णय राज्य पातळीवरच घेतला जाईल, असंही त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बैठक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची, चर्चा मात्र अजित पवारांची!

“महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More