बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपमधील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही- खासदार संभाजीराजे

मुंबई | 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजी छत्रपती यांनी केली. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. आधी मोर्चा काढतो म्हणाले. नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटलं. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हणाले. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

मोर्चा काढायचा रद्द करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांना केला आहे. यावर आता संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर बघू. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

पुढील तीन तास मुंबईसाठी धोक्याचे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेची विनंती विद्यापीठाने फेटाळली, तब्बल 9 हजार विद्यार्थी होणार नापास

प्रशांत किशोर यांची भाजप विरोधात मोहिम?; प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीचा खुलासा

कोरोनातून देश सावरतोय; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 70 दिवसांतील मोठी घट

‘मुस्लिमांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावं’; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More