बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही मानत असाल तर…”

सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच आरक्षण रद्द केलं आहे. त्या दिवसापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्दयावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये वारंवार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. पडळकरांनी सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितला होता. मात्र राज्य सरकारने तो केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून समाजा- समाजामध्ये तिढा वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. तर काही ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकारही हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात. त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांची खिल्ली उडवली आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

अँटीबाॅडी तयार न झाल्यानं अदर पुनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात न्यायालयात अर्ज

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More