बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकार पडणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thakeray) सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे  विरोधी पक्षांकडून सातत्याने राज्य सरकार अंतर्गत वादाने पडेल, असा दावा केला जात असताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) पडेल वाटत असं वाटत नाही, असं वक्तव्य केलं आहे.

पत्रकारांनी राज ठाकरे यांना ठाकरे सरकार (Mahavikas Aghadi government) पडणार का? असा प्रश्न केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असं वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे घोटोळे मी काढणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच पाच लाख व्यावसायिक देश सोडतात तेव्हा नोकऱ्यांवर काय परिणाम होतो याची चर्चा आपण करत नाही. आर्यन खानची बातमी आपण 28 दिवस चालवतो, सुशांतसिंह प्रकरण, अँटिलिया प्रकरण आपण लावून धरतात, परंतु, हे पाच लाख उद्योजक कुठे गेले याचा आपल्याला शोध घ्यावासा वाटत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी माध्यमांची कानटोचणी केली आहे.

दरम्यान, संभाजीनगरची निवडणूक वर्षभर पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर महापालिकांच्या निवडणुका (Municipal Corporations) होणार आहेत. मात्र, त्याचीही खात्री देता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणुका 6 किंवा 8 महिने पुढे जातील असं चित्र दिसतयं. त्यासाठी ओबीसीचे प्रकरण सुरू आहे. केंद्राने मोजायचे की, राज्याने मोजायचे यावरून मोजामोजी सुरू आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

मनसेचा अजेंडा काय? राज ठाकरे म्हणतात, “सध्या आघाडीचे दिवस पण…”

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

‘हा तर घोडेबाजार’; नागपूरातील पराभवानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

MLC Election: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळे यांना अश्रू अनावर

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More