रत्नागिरी | तुम्ही बेकार आहात. गेले तीन महिने तुम्ही वांग्याचं भूत करून ठेवलंय, असं म्हणत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी माध्यमांवर निशाणा साधाला आहे. रत्नागिरीतील सभेला आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास साफ नकार दिला.
चिपळूणमधील शिवप्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान संभाजी भिडेंना विरोध झाल्याचं दिसलं. तेव्हा माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ‘गेले तीन महिने एकच विषय चघळत बसला आहात. मला तुमचं तोंडही बघायचं नाहीए, असं भिडे यांनी माध्यमांना म्हटलं.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी भिडेंना गाडीच्या मागच्या सीटवर बसायला सांगितलं असता. मी भित्रा नाही, ही काय मोगलाई आहे का?, मी पुढेच बसेन, असं भिडेंनी पोलिसांना म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-केरळ सरकारला हवीय यूएईची 700 कोटींची मदत; मोदी सरकार म्हणतं नको!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींना का मिठी मारली?; राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला खुलासा
-… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद
-सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!
-विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला!