“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
मुंबई | आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर तर जोरदार हल्ला केल्याचं पहायला मिळालं. यावेळी राऊतांनी सोमय्यांवर घणाघाती टीका केल्याचं पहायला मिळालं.
सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी थेट संबंध असल्याचा आरोप राऊतांनी केल्याचं पहायला मिळालं.
हा जो किरीट सोमय्या आहे तो एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. पुढे राऊतांनी म्हटलं की,“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
दरम्यान, किरीट सोमय्यांसोबतच राऊतांनी नील सोमय्यांवरही गंभीर आरोप केल्याचं पहायला मिळालं. दोघांनाही अटक करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या –
“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट
“मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा असा उल्लेख
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”
Comments are closed.