बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

YouTube कडून महिन्याला मला ‘इतके’ पैसे मिळतात- नितीन गडकरी

मुंबई | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विद्यापीठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना भाषणांमुळे युट्युबकडून दर महिन्याला पैसे मिळतात, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

युट्यूबवरून जी भाषणे दिली, त्यासाठी आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आजच्या घडीला मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये दिले जातात. हे पैसे कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून मी दिले आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

कोरोना संकटापूर्वी फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. मी त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हतं. मात्र कोरोना संकटामुळे सोशल मीडियावर सक्रीय व्हायला लागलो. कोरोनामुळे आयुष्यात मोठे दोन ते तीन बदल घडले, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. रोज सकाळ संध्याकाळ मी 25 मिनिटं पायी चालतो. युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो. मला दहावा अध्याय आणि त्याचे पूर्ण विवेचन शांततेत ऐकण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच कोरोना कालावधीमध्ये जवळपास 950 व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या, अशी माहितीही गडकरींनी यावेळी दिली.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय, शिवसेना आमदार खूश, राष्ट्रवादीचा मंत्री नाराज!

“डिपॅाझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी मिळाली फक्त अजितदादांच्या जपामुळे”

काँग्रेसचा हा बडा नेता म्हणतो, ‘मोदींना कोट्यवधी मृत्यूंचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान हवेत’

फरार विजय माल्याची मालमत्ता आता SBI विकू शकणार; माल्याकडे 14 हजार कोटींची थकबाकी

कमरेला पदर खोचून आजीबाईंचा परफेक्ट बोलिंग नेम; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More