बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा देत मोदींनी सांगितली 40 वर्षांपूर्वीची आठवण, म्हणाले…

पुणे | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेबांबद्दलची 40 वर्षांपूर्वीची आठवण सांगितली आहे.

पुण्यातील आंबेगण येथील सरकारवाड्यातून शिवचरित्र घराघरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा देणारा संदेश पाठवला होता.

चार दशकांपूर्वी अहमदाबादमध्ये जेव्हा तुमचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा मी त्या कार्यक्रमांना उपस्थित राहत होतो. सुरूवातीला जाणता राजाच्या काळात मी हा कार्यक्रम बघण्यासाठी एकदा पुण्यात गेलो होतो. बाबासाहेबांनी खरा इतिहास युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे, त्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत, असंही नरेंद्र मोदी म्हणालेत.

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या ज्या आदर्शांना तुम्ही देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ते आदर्श आम्हांला दशकांपर्यंत प्रेरणा देण्याचं काम करणार आहेत. मी देशाच्या इतिहासकारांना सांगेन, की जेव्हा स्वातंत्र्यांचा इतिहास लिहाल तेव्हा हीच प्रेरणा आणि प्रमाणिक पणाची कसोटी तुमच्या लिखाणात असायला हवी असंही नरेंद्र माेदी यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; आता आणखी एक टीम करणार चौकशी

राज्यातला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; मृत्यूच्या संख्येत होेतेय वाढ

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विरोध

‘…हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं’; राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; इतक्या पदांसाठी भरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More