बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी करताना काॅंग्रेसला फसवलं जाईल, हे मी स्पष्ट सांगितलं होतं”

अकोला | अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली पहायला मिळत आहेत. यातच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रचार सभा घेत आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

अकोल्यातील नगरपंचायत काॅंग्रेसच्या ताब्यात द्या, आम्हा बदल करुन दाखवतो, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी प्रत्येक जण आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणारच आहे तसेच काँग्रेसही करीत आहे. काँग्रेस (Congress)पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीची गरज भासणार नाही, असं प्रचार सभेत बोलताना थोरात यांनी म्हटलं.

काॅंग्रेससाठी घेतलेल्या कालच्या प्रचार सभेत बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधल्याचं पहायला मिळालं. अकोल्यात महाविकास आघाडी करताना काॅंग्रेसला फसवलं जाईल, हे मी स्पष्ट सांगितलं होतं आणि तसंच झालं. त्यामुळे मला अकोल्यात महाविकास आघाडी व्हावी अशी अपेक्षा होती मात्र खात्री नव्हती.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आता या निवडणुकीत काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राष्ट्रवादीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् रुपाली ठोंबरे म्हणाल्या ‘…हेच आहेत पवार साहेबांचे संस्कार’

अजितदादांचा दिलदारपणा! एका मिनिटात केली अमित शहांच्या मुक्कामाची सोय

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More