बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

नाशिक | राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक (Goverment And Oppostion) यांच्यात सध्या जोरदार जुगलबंदी रंगली आहे. एसटीचा संप, गृहखात्याचा कारभार, एनसीबीची कारवाई, यावरून जोरदार कलगीतूरा रंगला आहे. एसटी संप संपण्याचं नाव घेत नाही. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या लालपरीची चाकं सध्या थांबली आहेत. सरकारकडून पगारवाढीची घोषणा करूनही संप मिटला नाही. तरी या आंदोलनात सहभागी झालेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतली आहे. परिणामी या दोन्ही नेत्यांवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे.

गृहपाठ न केल्यानं तोंडावर पडावं लागतं. शेतकरी आंदोलन वेगळं आणि इतर आंदोलन वेगळं, अशी जोरदार टीका राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर केली आहे. चळवळ म्हणजे एकप्रकारचा वाघ आहे. या वाघावर स्वार होणं हे सोपं नाही. एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं हे कठीण आहे. पायउतार झालात तर तो वाघच तुम्हाला खाऊन टाकतो, असंही शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनातून माघार घेतली आहे. पगारवाढीचा निर्णय हा मार्ग काढण्यात आला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी, असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

आता पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार, सरकारचा मोठा निर्णय

“साखरेला चांगला भाव मिळतोय, आमच्या ऊसाचा भावही वाढवा”, राजू शेट्टींचा एल्गार

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

पोलिसाला लाच घेताना पकडण्यासाठी स्वतः आमदारच बनला ट्रकचालक, पाहा व्हिडीओ

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More