महाराष्ट्र मुंबई

माझं ऐकलं असतं तर दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली नसती!

मनमाड | मी 2005 मध्ये सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हा माझे एेकले असते तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कुलबर्गी यांच्या हत्या टळल्या असत्या, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते मनमाडमध्ये बोलत होते.

फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपविण्याचे षडयंत्र सध्या सनातन संस्थेचे साधक करत आहेत. ते वेळोवेळी सिद्धही होत आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, सध्या देशात दलित-हिंदू-मुस्लिम असा नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!

-कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचा भिवंडीत धुडगूस; नागरिकांची एकच पळापळ

-पुण्यातील बेपत्ता झालेली ती दोन कुटुंब सापडली; पाहा नेमकं काय घडलं…

-ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन

-गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या