बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संकटं आल्यामुळेच मी घडले- सिंधूताई सपकाळ

मुंबई | परिस्थिती माणसाला शिकायला, करायला भाग पाडते. काटेरी रस्त्यावरून चालल्यावर मागे फुले उगवतात. संघर्ष करण्याची परवानगी मिळाली, की जगण्याची दिशा कळते, अशी शब्दरूपी ऊर्जा सिंधूताई सपकाळ यांनी राज्यभरातील तरुणाईला दिली. ‘यिन’तर्फे आयोजित फेसबुक लाइव्ह मुलाखत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यभरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सरणावर जगण्याची भाकरी भाजली, की मरणाची भीती आपोआप निघून जाते. जळणाऱ्या प्रेताला पाहून जगण्याची प्रेरणा मला मिळाली. माझ्यावर आलेल्या संकटांमुळेच मी घडले असल्याचं सिंधूताऊ सपकाळ यांनी म्हटलं आहे. संदीप काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सिंधूताई  म्हणाल्या, की देवाने बाईच्या जातीला ‘ओव्हर टाइम काम दिले आहे. कितीही अडचणी असल्या तरी आई लेकराची समजूत काढत असते. आईने संकटांवर मात केली, की मुले कधीच वाया जात नाहीत

संस्कार आणि संघर्षाची परंपरा जोपासत महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण रक्तदान, प्लाझ्मादान, घरपोच जेवण, रुग्णांना वैद्यकीय मदत करत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो, आजची तरुणाई वाया गेली नाही, तर ती कोरोनावर मात करण्यासाठी सरसावली आहे, असंही माई म्हणाल्या.

दरम्यान, विज्ञानामुळे हे जग खूप पुढं गेलं आहे. आपली, आपल्या परिवाराची काळजी घेत समाजाचीही काळजी घ्यायची आहे. मरणाऱ्यांसाठीच आपल्याला जगायचं आहे, जातील हे दिवस, पुन्हा नव्याने उभारी घ्यायची आहे, असा सकारात्मक दृष्टिकोनही सिंधूताईंनी तरूणाईला दिला.

थोडक्यात बातम्या- 

‘मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच मन की बातची टेप लावली’; मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

पुण्यातील ‘त्या’ पोलिसाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, बुधवार पेठ कनेक्शन?

आता काही सेकंदात कळणार कोरोना चाचणीचा निकाल; मुकेश अंबानी बोलवणार इस्राईलची विशेष टीम

“सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये”

पुण्यातील कडक लाॅकडाऊनबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचं सुचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More