बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आलेला- मेधा कुलकर्णी

पुणे | कोथरुड विधानसभाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून पुन्हा एकदा डावलण्यात आलं. दरम्यान मेधा कुलकर्णी यांनी मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता. मात्र कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्यासाठी मी ती जागा मोकळी केली. त्यावेळी मला विधानपरिषदेवर घेतलं जाईल असं सांगण्यात आलं होतं.”

त्या पुढे म्हणाल्या, “कोथरूड माझं माहेर असल्याने तिथून निवडणूक लढवण्याइतकी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. मुळात कोथरूड हे माझ्यासाठी स्वर्ग आहे आणि कोणत्याही महिलेला माहेर किती प्रिय असतं हे प्रत्येकाला ठाऊक आहे.”

दरम्यान पुढील निवडणुकीत संधी मिळाली तर नक्कीच कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही मेधा यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत

मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार

..तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?- प्रवीण दरेकर

“राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत”

“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More