बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई | माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस टीका करत असतात. अशातच आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी क्रिकेटच्या शैलीत खास शाब्दिक फटकेबाजी करत सरकारवर निशाणा साधला.

क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या परिस्थितीत मला इतके लूज बॉल मिळतायत की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. बॉलिंगचं म्हणायचं तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल आणि ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. मला वाटतं की त्यामुळेच समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्या मारल्या. तर यावेळी बोलताना फडणवीसांनी रश्मी शुक्ला प्रकरणावर आपलं मत मांडताना सरकारला लक्ष्य केलं.

दरम्यान, माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठिशी घालतंय हे स्पष्ट दिसत असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या- 

पूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

“कॅप्टन बदला हे संघाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीने सांगून त्याचा काही फायदा होत नसतो”; फडणवीसांचा राऊतांना चिमटा

‘…म्हणून आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून जाड झाल्या’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर; ‘या’ जिल्ह्यातही आजपासुन कडक लाॅकडाऊनचे आदेश!

धक्कादायक! विद्यापीठाच्या आवारातच पाहत होते शिक्षक आणि कर्मचारी पॉर्न फिल्म

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More