बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझे अनेक बाॅयफ्रेंड झाले पण….”; अभिनेत्री तब्बूचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

नवी दिल्ली | बॉलिवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखलं जातं. वयाची 50 ओलांडूनही अद्याप तब्बू अविवाहित आहे. याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. दाक्षिणात्य सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन याच्यासोबत तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या.

नागार्जुन आणि तब्बू एकमेकांना डेट करत होते. तब्बूने यासर्व गोष्टींवर मौन सोडलेलं पहायला मिळालं. करण जोहरच्या टॉक शो कॉफी विद करण या मध्ये तब्बूनं हजेरी लावली होती. करणने यावेळी तिला बॉयफ्रेड, नागार्जुनसह विविध गोष्टीवर प्रश्न विचारले होते. बॉयफ्रेंडहबद्दल मीडियामध्ये फार उत्सुकता आहे. असं करणने तब्बूला विचारलं होत.

उत्तर देताना तब्बू म्हणाली,”माझे अनेक बॉयफ्रेड होते, पण नागार्जुन मात्र कायम राहिला.” नागार्जुन हा माझ्या आयुष्यातील अशा मोजक्या लोकांपैकी आहे जो माझ्या जवळ आहे. नागार्जुनसोबतच्या नात्यामुळे माझ्यावर कोणताही ताण येत नाही. पण मी त्या नात्याला काहीही नाव देऊ इच्छीत नाही, असं तब्बूनं सागितलं आहे.

दरम्यान, नागार्जुन आणि तब्बूची एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ओळख झाली होती. ते दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात पडले होते. नागार्जुन आणि तब्बू रिलेशनशीप जवळजवळ 10 वर्ष सुरू असल्याचं असल्याचं पहायला मिळालं. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचं होतं आणि पत्नीसोबत घटस्फोटही घ्यायचा नव्हता. मात्र तब्बूला हे मान्य नव्हते. काही दिवसांमध्ये दोघांच्या रिलेशनशीपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर तब्बूनं नागर्जुनमुळे लग्नच केलं नाही अशा चर्चा सुरु झाल्या.

थोडक्यात बातम्या – 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका, म्हणाले….

मोठी बातमी! राज्याच्या अनलाॅकविषयी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांसाठी मोठी योजना, ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले….

“भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, चार केंद्रीय मंत्र्यांना…”

“काही लोक दाऊदची धुणीभांडी करतायेत ती आधी बंद करायला लावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More