बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या अनेक नेत्यांना मी घरी बसवलंय- अण्णा हजारे

मुंबई | भाजप अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता अण्णा यांनी उत्तर दिलं आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांना मी घरी बसवलं असल्याचं ते म्हणालेत. अण्णा हजारे औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीच्या लिकर धोरणावर मुख्यमंत्री केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी पत्र लिहिलंय. या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा पत्र लिहित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या दारू धोरणाबाबत येत असलेल्या बातम्या वाचून खूप वाईट वाटत आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More