Top News राजकारण

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना, बीएचआर घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं गिरीष महाजन यांनी स्पष्ट केलंय.

ते पुढे म्हणाले, “कोणाच्या पतसंस्थेत घोटाळा झाला तर त्याची चौकशी व्हावी. परंतु, माझ्यावर केवळ राजकीय कारणासाठी आरोप होतोय. बीएचआर घोटाळ्यामध्ये माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असल्यास योग्य ती कारवाई व्हायला हवी. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल.”

घोटाळ्याशी माझा संबंध नसून सुनील झंवर हा पूर्वीपासून चांगला मित्र आहे. याच कारणाने मला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा, आरोप देखील गिरीश महाजन यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात!

“दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला”

रजनीकांत अखेर राजकारणात, ‘या’ दिवशी करणार पक्षाची घोषणा!

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या