Top News

‘मी आधीही सांगितलंय आणि पुन्हा एकदा सांगतो…’; सभागृहात विरोधकांच्या गदारोळानंतर मोदींचं ट्विट

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला.

सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरू असताना आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही दिली.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं जगणं अधिक सुखकर करू, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या