बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांच्यावर जबाबदारी देऊन पाहिलंय…”, अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई | आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation election) आता शिवसेना, भाजप आणि मनसे हे तिन्ही पक्ष तयारीला लागल्याचं दिसत आहेत. त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपाला देखील सुरूवात झाली आहे. अशातच आता मनसेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे.

आज मनसेकडून राज्यातील एकूण 40 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यावेळी खुद्द अमित ठाकरे यांनी या मोहिमेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी सर्व लोकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन देखील केलं आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेेनेवर निशाणा साधला आहे.

स्वच्छता मोहिमेसाठी इच्छाशक्ती लागते. गेली 25 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिकेची सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांच्याकडे दुर्दैवाने इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीत, अशी टीका अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाच्या बाबतीत कसं काम होणार?हा आपला समुद्र किनारा आहे. हा आपण साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेऊन चालणार नाही. त्यांच्यावर जबाबदारी ठेवून पाहिलंय काय होतंय ते, असा टोला देखील त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”, अभिनेत्री मीनाक्षी राठोडची पोस्ट व्हायरल

“उघड दार देव आता उघड दार देव”, सदाभाऊ खोत यांचं जोरदार प्रत्युत्तर

“खलिस्तानी म्हटलं, बदनाम केलं गेलं, सरकारनं आडमुठेपणा केला म्हणून…”

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More