बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलंय, मला बोलू द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं”

नवी दिल्ली | मंगळवारी लोकसभेत केंद्र सरकारने 127 वं घटनादुरूस्ती विधेयक पारित केलं. या घटनादुरूस्ती विधेयकानुसार राज्यांना आता आरक्षणाचा अधिकार मिळणार आहे. लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. त्याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजाराजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपलं म्हणणं मांडलं आहे.

आरक्षणाच्या बाबतीत राज्यांना काय अधिकार असतो?, तर देण्यात येणारं आरक्षण हे अपवादात्मक स्थितीत आहे की नाही, हे राज्य सरकार ठरवू शकतं. पण जर घटनेत बदल करायचे असतील तर ते केंद्राला करता येतात, राज्यांना यात बदल करता येत नाही. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पार करायची असेल तर, ती राज्याच्या शिफारसीवर केंद्राला पार करता येतं, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

आज राज्यसभेत बोलण्यासंदर्भात मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. आता त्यांनी ठरवायचं मला बोलू द्यायचं की नाही. कारण मी स्पष्ट बोलतो, माझ्या बोलण्याचा जर त्यांना त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझी भूमिका स्पष्टच मांडली आहे. मला विश्वास आहे की, ते मला बोलू देतील, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, मी 2007 पासून लढतोय, आजही माझा लढा चालूच आहे. मला इतकंच माहिती आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे, असंही ते यावेळी म्हणाले होते. लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. तर आज राज्यसभेत पारित झाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तोपर्यंत RSSचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा”

भारतातील ‘ही’ चार मोठी शहरं पाण्याखाली जाणार; IPCC चा धक्कादायक रिपोर्ट

कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई

मुंबईकरांची पाससाठी रेल्वे स्थानकावर गर्दी, वाचा पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More