बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

कोल्हापूर | मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एकत्र करून आरक्षणासाठी लढा पुकारला आहे. मराठा क्रांती मूक आंदोलनाची सुरुवात आजपासून संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून झाली आहे. दरम्यान, या आंदोलनात सर्व लोकप्रतिनिधींनी येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन संभाजीराजे यांच्यातर्फे करण्यात आलं होतं.

कोल्हापुरातून सुरू झालेलं मराठा क्रांती मूक आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. दरम्यान, या आंदोलनात सतेज पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील यांनी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री व इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी आपण उद्याच मुंबईला या असं आमंत्रण संभाजीराजेंना दिलं आहे.

या आंदोलनावेळी खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील तसेच धनंजय महाडिक इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजितदादा आपल्याला भेटतील, शिवाय आपण उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत राज्य सरकारही सकारात्मक असल्याचं सतेज पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.

सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे आणि या संयमाला राज्यशासन म्हणून आम्ही चर्चेची साथ देऊ आणि राज्य सरकार यासंबंधी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो असं या आंदोलनावेळी मराठा समाजाला व संभाजीराजे यांना उद्देशून म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात; मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू”

“लोक सरपंचपद वाटून घेतात, तसे महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं”

“अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार”

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More