बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तेव्हा हे कलाविश्व अत्यंत क्रूर आणि निर्दयी होत जातं”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यावर अभिनेता रणवीर शौरीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही यशस्वी होत असताना कलाविश्व निर्दयी बनत जातं, रणवीर शौरीने म्हटलं आहे.

करिअरचा आलेख उंचावत असताना सुशांतने अचानक एक्झिट घेतली. पण त्यांच्या निधनामुळे आपल्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्याची उत्तरं आपल्यालाच शोधावी लागणार आहेत. नेमकं सुशांतच्या मनात काय सुरु होतं त्याच्या कुटुंबीयांची अवस्था पाहिल्यावर जीव तिळतिळ तुटतोय, असं रणवीर शौरी म्हणाला आहे.

गेल्या काही काळापासून आम्ही संपर्कात नव्हतो, पण ज्यावेळी मी त्याला शेवटचा भेटलो त्यावेळी तो त्याच्या कामाविषयी फार उत्सुक आणि आनंदी दिसत होता, असं रणवीर शौरीने सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत सारखा हरहुनरी कलाकार आपल्याला असं अचानक सोडून गेला. मला एक सांगावसं वाटतं, जेव्हा तुम्ही यशाचं शिखर सर करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी हे कलाविश्व अत्यंत क्रूर आणि निर्दयी होत जातं. त्यामुळे कलाविश्वात मोकळेपणा आणि स्वतंत्रता मिळायला हवी, तसं वातावरण निर्माण व्हायला हवं, असंही रणवीर शौरीने म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

सामनातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता संजय राऊत म्हणतात…

कोरोनामुळे शिक्षण थांबता कामा नये, तर…- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटचा खाटांचं बघा”

“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

…त्यानंतर राऊतांनी अग्रलेख लिहावा, सामनाचा आताचा अर्धवट अग्रलेख; थोरातांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More