बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं आहे, असा खोचक टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला होता. आता याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार असं मला कळतंय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेनं घेत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सध्या चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दीक चकमक राजकीय वर्तुळात विनोदाचा विषय ठरत आहे.

दरम्यान, याआधी राजकीय जीवनात आम्ही एकमेकांवर टीका करत असलो तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. माजी मंत्री म्हणवून घेणं त्यांना आवडत नाही. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो, असं संजय राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्री महोदय तुम्ही फक्त पाठीशी उभं रहा बाकी मी बघतो”

‘…हे त्यांना रिअलाईज झालं असेल’; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय- उद्धव ठाकरे

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More