मुंबई | बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत असल्याने मलायका सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाली आहे. तर वयाच्या पन्नाशीतही फिट असलेली मलायका तिचे बोल्ड फोटो अनेकदा शेअर करते.
बॉलिवुडमधील सर्वात सेक्सी आणि हॉट महिला म्हणून मलायकाकडे पाहिलं जातं. नियमित योगा आणि व्यायाम यामुळे मलायका पन्नाशीतही बोल्ड आणि सेक्सी दिसते. बी टाऊनमधील सर्वात सेक्सी महिलेचा किताब (Tag) कायम स्वत:कडेच ठेवायचा असल्याचा खुलासा मलायकाने एका मुलाखतीत बोलताना केला आहे.
निस्तेज आणि थंड म्हणून ओळखलं जाण्यापेक्षा सेक्सी आणि हॉट म्हणून ओळखलं जाणं मला आवडतं, असं मलायका पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटली आहे. मला नेहमी सेक्सी म्हणून ओळखलं गेलं आहे. त्यामुळे त्या नावाप्रमाणे जगलं पाहिजे असं मला कायम वाटतं, असंही मलायकाने सांगितलं आहे.
दरम्यान, बी टाऊनमधील सर्वात सेक्सी महिलेचा किताब मी घट्ट धरून ठेवला आहे. मी इतक्या लवकर तो जाऊ देणार नाही. सर्वात सेक्सी महिलेचा किताब कायम माझ्याकडेच राहिल असा प्रयत्न मी करणार आहे, असंही मलायका मुलाखतीत बोलताना म्हणाली आहे.
थोडक्यात बातम्या-
पुतिन यांनी मोडला तब्बल 70 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड
‘आप’ संदर्भात गोपीनाथ मुंडेंनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी चर्चेत; पाहा व्हिडीओ
मुंबईतील कपलचा खुल्लम-खुल्ला प्यार, kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ
तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार गलेलठ्ठ पगार
Comments are closed.