Top News महाराष्ट्र मुंबई

मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा

मुंबई | प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत राहत असतात. अशातच राम गोपाल वर्मा यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मला महिलांचं शरीर आवडतं पण डोकं आवडत नसल्याचं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करतही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

राम गोपाल वर्मा यांनी विचारण्यात आलं की तुम्ही महिलांबाबत असे विचार का करता यावर ते म्हणाले की, ‘मी आता माझं मत का बदलू? बदलण्यासाठी आता काहीच नाही.

दरम्यान, मी कोणत्या नात्यात नाही ना मी भावनिक होत कोणातच अडकलो नसून मी आता खूप व्यस्त आहे. त्यासोबतच मला लग्न या व्यवस्थेवर विश्वास नसल्याचं राम गोपाल वर्मा म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती

कटकट बंद करा!; बिग बींच्या आवाजातील त्या काॅलरट्यूनविरोधात जनहित याचिका

“2024मध्ये काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार”

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या