बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी मोदींवर खूप प्रेम करतो, ते मला आवडतात- शायर मुनव्वर राणा

लखनऊ | अफगाणिस्तान आणि तालिबान या दोन्हींची चर्चा सध्या सर्व जगात होत आहे. अफगाणिस्तानची सत्ता उलथवून लावून तालिबानने तेथे आपली सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. पंचशीर हा एकमेव प्रांत आता काबिज करणं बाकी राहिलं आहे. अफगाणिस्तान सध्या प्रचंड अराजकतेतून जात आहे.

अफगाणिस्तानमधील सत्तांतरण हे तालिबानी दहशतवाद्यांनी केलेला सत्तेविरूद्धचा संघर्ष आहे. तालिबानच्या विकृतीला काही देश आपला पाठिंबा देताना पहायला मिळत आहेत पण अद्यापी भारत सरकारने तालिबानबाबत आपले कोणतेही अधिकृत मतं जाहीर केलं नाही. त्यामुळे तालिबानला समर्थन करताना कोणी आढळताना दिसलं तर त्याला तालिबानी समर्थक घोषित केलं जात आहे. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी केलेल्या तालिबानच्या समर्थनावरून आता देशातील वातावरण पेटलेलं आहे.

राणांवर जळगाव आणि लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. आता आपल्या वक्तव्याला गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आपण मोदी यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या कामाची शैली आपल्याला प्रचंड आवडत असल्याचं ते म्हणाले आहेत.

मी जेव्हा माझा पुरस्कार वापस केला होता, तेव्हा ते माझ्यावर नाराज झाले होते. तसेच, माझ्या आईच्या निधनानंतरही त्यांनी मला सांत्वनपर पत्र पाठवलं होतं. मी मोदींना भेटायला गेलो होतो, तेव्हाही त्यांच्याशी चांगला वार्तालाप झाल्याचं राणा यांनी सांगितलं. तालिबान्यांनी आपली भूमी मिळवली ते त्यांच्या देशासाठी लढत आहेत. ते दहशतवादी कसे असतील असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या 

आढळराव पाटलांचा गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले…

“नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं, माझ्यावर टीका करुन त्यांना…”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

वीरूसोबत फलंदाजीला आलेल्या ‘या’ खेळाडूने क्रिकेट बोर्डावर केले मानसिक शोषणाचे आरोप!

…अन भर रस्त्यात महिलेला काही समजण्याच्या आत तरूणाने घेतला किस, व्हिडीओ तुफान व्हायरल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More