नवी दिल्ली | आग्रामध्ये एक मन हेलावून टाकणारी प्रेमकथा समोर आली आहे. मात्र या प्रेमकथेचा अंत असा झाला की प्रियकराला त्याचा जीव गमवावा लागला आहे. प्रेमसंबंधात असलेल्या जोडप्यामधील मुलीचं नाव सोनम तर मुलाचं देवेंद्र असं आहे.
देवेंद्रचं काही दिवसांपुर्वी एका मुलीसोबत लग्न ठरल्यामुळे सोनम आणि देवेंद्रमध्ये सतत वाद होत होते. यादरम्यान आपल्या घराचा पंख बिघडला असून तो दुरुस्त करण्यासाठी सोनमने देवेंद्रला घरी बोलावलं होतं. त्यानंतर त्या दोघांचा पुन्हा एकदा वाद पेटला आणि सोनमने देवेंद्रवर अॅसिडने हल्ला केला.
देवेंद्रवर अॅसिड ओतल्यानंतर तो आरड ओरडा करु लागला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील आजूबाजूचे लोक जमा झाले. त्याला रुग्णलयात नेण्यातं आलं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. यानंतर सोनमवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, अॅसिड अॅटकच्या वेळेस सोनमच्या अंगावर देखील अॅसिड सांडल्यामुळे सध्या तिच्यावर उपचार चालु आहे. मात्र तिचे उपचार पुर्ण होताचं तिच्यावर कारवाई केली जाईल असी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी
ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स
ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.