बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी मोदींच्या शपथविधीला गेले नाही- पंकजा मुंडे

मुंबई |  मागच्या वेळी माझ्या बाबांनी(गोपीनाथ मुंडे) मोदींच्या मंत्रीमंडळात शपथ घेतली होती. मात्र आता ते या जगात  नाहीयेत. मला त्यांची प्रचंड आठवण येत होती. म्हणून मी नरेंद्र मोदींच्या शपथविधीला गेले नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

गुरूवारी नरेंद्र मोदी यांनी 57 मंत्र्यांसह पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधी सोहळ्यास भाजप नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या.

2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात ऐतिहासिक विजय मिळवला होता. यावेळी  महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडेंनी देखील नरेंद्र मोदींना मोलाची साथ दिली होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंना केंद्रिय ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आलं होतं.

दरम्यान, रावसाहेब दानवेंना केंद्रात मंत्रीपद दिल्याने महाराष्ट्रात भाजपाध्यक्ष पदासाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘ओडिशाच्या मोदींचं’ ते वाक्य ऐकून लोकांना झाली वाजपेयींची आठवण!

-मोदींनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत संजय राऊत म्हणतात…

-सुषमा स्वराज मंत्रीमंडळात नाहीत; लोक म्हणतायेत आम्हाला तुमची खूप आठवण येईल…

-वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मोदींच्या मंत्रीमंडळातून ‘या’ मंत्र्याला वगळलं

-राज ठाकरेंची भूमिका काय? स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More