बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला विरोध करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे’; उदयनराजेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई  |भाजप खासदार उदयनराजे आपल्या खास शैलीसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. सातारा नगरपरिषद निवडणुकीवरून सध्या साताऱ्यात जोरदार राजकीय वातावरण रंगलं आहे. अशातच आता उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. अशातच आता एका बैठकीत सातारा क्रीडा संकुलच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.

मी नाही, मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. शाहू संकुल हे क्रीडा संघ करायचे सोडून त्याचं व्यापारी संकुल करण्यात आलं असा आरोप देखील त्यावेळी त्यांनी केला आहे. अॅथेलिटीक ट्रॅक हे आयताकृती असावं लागतं ते तर गोल आहे, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

मी कारण नसताना विरोध केला असं म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना आणि आमदारांना जोड्यानं मारलं पाहिजे, असा टीका उदयनराजे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षरित्या केली आहे. या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी मला विरोध देखील केला असंही उदयनराजे म्हणाले आहेत. त्यांचं नाव घेतलं तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल म्हणून मी नाव पण घेत नाही, असा टोला देखील उदयनराजेंनी यावेळी अजित पवारांना लगावला आहे.

दरम्यान, हे यासाठी सांगतोय हे मीडियात आलं पाहिजे. ही आमदार, खासदार ही जी सो कॉल्ड माकडं आहेत. त्यांनी यातून बोध घ्यायला पाहिजे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुझी मर्जी म्हणजे तुुझा अधिकार होऊ शकत नाही’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्धार

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More