बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…- हेमंत ढोमे

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही बडे राजकीय नेते, अभिनेते यांनाही कोरोनाने आपला बळी केलं आहे. दिवसेंदिवस मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढु लागली आहे. मृत पावलेल्या रूग्णांवर अंत्य संस्कार करण्यासाठी स्मशानभूमित रांगा लागू लागल्या आहेत. अशाच प्रकारे दिल्लीतील एका बागेचं स्मशानभूमीत रुपांतर करण्यात आलं आहे.

पहिली जिथे बाग होत तिथे आता स्मशानभूमी झाल्याने अनेकांन दु: ख झालं. याच पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध अभिनेता हेमंत ढामेने त्या बागेबाबत एक ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये त्याने बागेचं स्मशानभूमीत झालेल्या रूपांतरामुळे त्याने आपल्या भावना ट्विट कर मोकळ्या केल्या आहेत.

बाग म्हणजे, खेळायची जागा, आज्जी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची. चिऊताई खारूताई बघायची जागा, साळुंखीची जोडी शोधायची जागा. तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं
पण आपण सारे मिळुन या राक्षसाला हरवु, पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवु, असं हेमंतने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हेमंतचं हे ट्विट सोशल माध्यमांवर चर्चेत आहे. हेमंतच्या ट्विटवर अनेकांनी  दु:ख व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनातून बरे झालेल्यांनी लस घ्यावी की नाही?; तज्ज्ञांनी दिला हा मोलाचा सल्ला; म्हणाले…

“मुंबईत ‘इतके’ लसीकरण राहणार बंद”; अतिरिक्त आयुक्तांनी दिली माहिती

पंतप्रधानांनी बोलवली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

“चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील”

“20 मिनिटात ॲम्ब्युलन्स नाही आली, तर मी सगळ्या ॲम्ब्युलन्स रॉकेल टाकून फुकुन देईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More